|
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे 411004 या स्वायत्त संस्थेची स्थापना 1965 च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. 41 मधील तरतुदींनुसार 1 जानेवारी 1966 रोजी झाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ त्याच्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी ह्या 9 विभागीय मंडळांच्या मदतीने महाराष्ट्र राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा घेते. मंडळातर्फे वर्षातून दोन वेळा ह्या परीक्षा घेतल्या जातात. मुख्य परीक्षेच्या उच्च माध्यमिक शालान्त अभ्यासक्रमासाठी साधारणपणे 14 लाख विद्यार्थी आणि माध्यमिक शालान्त अभ्यासक्रमासाठी 17 लाख विद्यार्थी प्रविष्ट होतात. तसेच पूरक परीक्षेला (ऑक्टोबर मध्ये होणा र््या) माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी एकत्रितपणे साधारण 6 लाख विद्यार्थी प्रविष्ट होतात. महाराष्ट्र राज्यात सुमारे 21000 माध्यमिक शाळा व 7000 उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये आहेत. |
|